Mobile Bans In Temples | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी (Mobile Phone Bans In Temples) घातली आहे. मंदिरांमध्ये मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे पाऊल हे प्रार्थनास्थळांची पवित्रता आणि पावित्र्य राखण्यासाठी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरांमध्ये फोन डिपॉझिट लॉकर उभारण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश 'हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉवमेंट डिपार्टमेंट'ला दिले आहेत. या संदर्भात तिरुचेंदूर, थुथुकुडी येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराचे एम. सीतारामन यांनी जनहित याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्यांनी मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती

न्यायालयाचे आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. सुब्रमण्य स्वामी मंदिरात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेनंतर हा उच्च आदेश आला. याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला की मोबाइल फोन लोकांचे लक्ष विचलित करतात आणि देवतांची छायाचित्रे क्लिक करणे हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिरांमध्ये मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे पाऊल प्रार्थनास्थळांचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी उचलण्यात आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरांमध्ये फोन डिपॉझिट लॉकर बसवले जातील जेणेकरुन दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना त्यांचे फोन सुरक्षित ठेवता येतील. (हेही वाचा, नवरात्रोत्सव 2018 : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांना ड्रेस कोडचं बंधन)

फोटोग्राफीमुळे मंदिरांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, शिवाय महिलांच्या संमतीशिवाय त्यांची छायाचित्रे क्लिक केल्याने नागरिक आणि भक्तांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. याचकाकर्त्याने मागणी केली होती की, मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी सभ्य ड्रेसकोडही असायला हवा.