Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay)

Fire At Printing Press In Kolkata: कोलकात्यातील साल्ट लेक सेक्टर 5 (Salt Lake Sector 5) मधील एका प्रिंटिंग प्रेस (Printing Press) ला दुपारी अचानक आग (Fire) लागली. आग लवकरच संपूर्ण प्रिंटिंग प्रेस परिसरात पसरली. आग लागल्यानंतर लगेचच प्रेसच्या बाहेरूनही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी अनेक अग्निशमन गाड्या दाखल -

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कारखान्यात प्रवेश करणे शक्य नव्हते. (हेही वाचा - Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही)

आगीची बातमी मिळताच अग्निशमन मंत्री सुजित बसू आणि विधाननगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवले गेले होते. ज्वलनशील पदार्थांमुळे आग लवकर पसरू शकते असा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे.  (हेही वाचा, Dharavi Fire: धारावी मध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मध्ये लागली आग; एकापाठोपाठ स्फोट होऊन उडाला भडका (Watch Video))

अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही -

दरम्यान, अग्निशमन मंत्र्यांच्या मते, अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील पाऊल उचलले जाईल. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.