Fire At E-Charging Station In Shahdara | PTI

Fire At E-Charging Station In Shahdara: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. येथे एका ई-चार्जिंग स्टेशनला अचानक आग (Fire At E-Charging Station) लागली. या आगीच्या घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना शाहदरा (Shahdara) परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ई-चार्जिंग स्टेशनमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. काही वेळातच आग आटोक्यात आली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दोन जणांचा होरपळून मृत्यू -

रविवारी दिल्लीतील शाहदरा परिसरातील एका ई-चार्जिंग स्टेशनला भीषण आग लागली. शाहदरा येथील मोती राम रोडजवळ सकाळी 6:40 च्या सुमारास आगीची घटना घडली. यानंतर पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. सकाळी 8:30 वाजता आग आटोक्यात आली. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरून दोन जळालेले मृतदेह सापडले असून चार जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 400 चौरस यार्ड परिसरात असलेल्या टिन शेडखाली ई-रिक्षांकडून शुल्क आकारले जात होते. (हेही वाचा - Delhi Rains: मुंबई-दिल्ली IndiGo Flight चं दिल्लीतील प्रतिकूल हवामान आणि विमानात अपुर्‍या इंधनामुळे Emergency Landing (Watch Video))

ई-रिक्षाला आग -

काही दिवसांपूर्वी शाहदरा परिसरातच एका ई-रिक्षाला आग लागली होती. येथे एका व्यक्तीने ई-रिक्षा चार्जिंगवर लावली होती. दरम्यान, अचानक ई-रिक्षाने पेट घेतला. आगीनंतर घर धुराने भरले होते. गुदमरल्यामुळे 2 मुलांसह 6 जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पीडितांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना पुढील उपचारांसाठी जीटीबी रुग्णालयात रेफर करण्यात आले.