Manoj Jarange-Patil Health Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाच दिवस आहे. गेल्या 5 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. शुक्रवार पासून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव मध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. (हेही वाचा- मनोज जरांगेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून आज बंदची हाक)
शुक्रवारी संध्याकाळी ते आपल्या समर्थकांना संबोधित करण्यासाठी उठले परंतु त्यांना थकल्यासारखे वाटत असल्याने ते अचानक खाली बसले. तेवढ्याच त्यांच्या सहकार्यांनी मदत करून त्यांना स्टेजवर आणले. त्यांना उठता येत नसल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी रात्री त्यांची त्यांची प्रकृती खालावल्याने उपस्थितस्थळी असलेल्या समर्थकांच्या डोळ्यात अश्रु आले. अनेक स्त्रीया रडताना दिसल्या. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे आणि त्यांच्यावर औषधोपचार करा अशी आवाहन दिले जात आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
सरकार अजूनही वेळ गेलेली नाही फक्त तोंडाला पाणं पुसायचे काम बस आता कायमस्वरूपी तोडगा काढा. विरोधी पक्ष तुम्ही सुद्धा ठोस भूमिका घ्या.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PawarSpeaks@OfficeofUT @NANA_PATOLE #Manoj_Jarange_Patil #फक्तपाटील pic.twitter.com/6T8HB0UZ7C
— Sangram Wagh (@ssmacan) September 20, 2024
परिस्थिती पाहता, उपस्थित डॉक्टरांनी धाव घेत शनिवार सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आली आणि औषध देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची तारीख जवळ आली असताना, बीड आणि धाराशीव बंदीची हाक देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.