मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे मागील 5 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू असताना आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) मध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. आज बीड मधील बंद हा शांतता पूर्ण वातावरणामध्ये पाळला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खाल्यानंतर काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली तरीही सरकार कडून दखल घेतली जात नसल्याने आता धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या निषेधार्थ हा बंद असला तरीही तो सार्यांनी शांततेमध्ये पाळावा असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. आज सकाळ पासून शहरात अनेक ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे. बंद दरम्यान अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. तर दुपार नंतर मराठा समाजातील बांधव आंतरवली सराटी मध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या बंद दरम्यान शहरातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे, परभणी, जालना रविवारी बंद राहणार
मराठा समाजाने पुणे आणि परभणी मध्ये मनोज जरांगेच्या समर्थनासाठी रविवार 22 सप्टेंबर दिवशी बंद राहणार असल्याचं जाहीर केले आहे. रविवारी अखंड मराठा समाजाच्या वतीने परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. तर उपोषणाला समर्थन देण्यासाठी परभणीतील मराठा समाज बांधवांनी आंतरवाली सराटी येथे उपस्थित रहावे असे केले आहे. 22 सप्टेंबरला मराठा समाजाने पुणे जिल्हा, तसेच जालन्यातही बंदची हाक दिली आहे.
ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जालन्यात वडीगोद्री येथे ओबीसीकडून उपोषण सुरू आहे. तेथून अगदी 3 किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.