'मन की बात' मधून नरेंद्र मोदी यांनी केले शहीदांचे कौतुक; आता पुढील कार्यक्रम लोकसभा निवडणुकीनंतर
Mann KI Baat | PM Narendra Modi | (Photo Credit: ANI)

'मन की बात' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) आजच्या (24/2/2019) कार्यक्रमात नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारक ची माहिती दिली. या कार्यक्रमात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभा निवडणूकीपूर्वीचा हा शेवटचा कार्यक्रम होता. 25 फेब्रुवारीला राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याचे मोदींनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांचे कौतुक करत हेच आपल्या देशाचे बलस्थान असल्याचे सांगितले.

'मन की बात' या कार्यक्रमात त्यांनी भारतीय सैन्याचे भरभरुन कौतुक केले. संयम आणि धैर्य बाळगत सैन्याने दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले. या हल्ल्यात भारताने अनेक जवान गमावले असून या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी फक्त जवानांचे नाही तर शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्याचे ही कौतुक केले. त्यांच्या धैर्यामुळे नागरिकांचा जोश अधिकच वाढला असल्याचे मोदींनी सांगितले.

लोकसभा निवडणूपूर्वीचा 'मन की बात'चा हा शेवटचा कार्यक्रम असून पुढील कार्यक्रम निवडणूकीनंतर मे महिन्याच्या शेवटच्या  रविवारी होईल.