Mann KI Baat | PM Narendra Modi | (Photo Credit: ANI)

कोरोना संकटात देश अनेक आघाड्यांवर लढत आहे. त्यामुळे या संधीचा उपयोग करण्यासाठी मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. दरम्यान, लहान मुलांच्या खेळण्यांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यासाठी खेळण्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात'च्या (Mann Ki Baat) 68 व्या भागात सांगितले. खेळण्यांचा उद्योग खूप व्यापक आहे. आपल्या देशाला परंपरा, क्रिएटीव्हीटी आणि युवा लोकसंख्या असलेल्या भारताचा खेळण्याच्या बाजारपेठेत आपले योगदान वाढले पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले.  यासाठी त्यांनी तरुणाईला खेळणी बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आत्मनिर्भर भारत (Aatm Nirbhar Bharat) अभियानाअंतर्गत टॉय सेक्टरमध्ये (Toy Sector) आत्मनिर्भर होण्यासाठी टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

स्थानिक खेळण्यांची फार मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. सुरेख खेळणी बनवणारी खूप कौशल्य कारागिर भारतात आहेत. देशामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये खेळांचे चांगले उत्पादन होते. अशी खेळणी निर्मिती करणारी केंद्र निर्माण करण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.

ANI Tweet: 

कम्प्युटर गेम आणि अॅप बनवण्यावर जोर देत मोदी असे म्हणाले की, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा वापर लोकांनी करावा. यासाठी KOO नावाचा एक अॅप आहे. ज्यामध्ये तुम्ही आपल्या मातृभाषेत टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे आपले म्हणणे मांडू शकता. तसंच इतरांशी संवाद साधू शकता. त्याचप्रमाणे चिंगारी नावाचा अॅप देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे. Ask Sarkar नावाच्या नवीन अॅपमध्ये सरकारी योजनांबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता.

कोरोना संकटाळात सणांचा उत्साह असला तरी निर्बंध देखील त्यांच्यावर कायम आहे. धार्मिक कार्यक्रमात जनतेने संयम दाखवला. तसंच ऑनलाईन, इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ओनम निमित्त त्यांनी अन्नदाता शेतकऱ्यांना नमन केले. खरीप पिक उत्पादनांत 7% वाढ झाल्याचेही त्यांनी 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले.

दरम्यान मन की बात या कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. विशेष करुन आज त्यांनी लहान मुलं, त्यांची खेळणी, खेळ आणि त्यातून त्यांचा होणारा मानसिक-शारीरिक विकास यावर भाष्य केले.