भोपाळ आणि इंदौर विमान हायजॅक करण्याची धमकी, आरोपीला अटक
Arrested

भोपाळ (Bhopal) मधील राजा भोज विमानतळावर मंगळवारी एका एअरपोर्ट टर्मिनल मॅनेजरला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. फोनवरील व्यक्तीने भोपाळ आणि इंदौर विमानतळावर विमान हायजॅक केले जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही विमानतळांवरील सुरक्षितता अधिक वाढवण्यात आली. तर पोलिसांनी मोबाईल क्रमांक ट्रेस केल्यानंतर शुजालपुर मधून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली.(Child Pornography In Kerala: केरळ पोलिसांनी चाइल्ड पोर्न प्रकरणात 28 जणांना केली अटक; 370 गुन्हे दाखल)

विमान हायजॅक करण्याची धमकी देणारा फोन मंगळवारी संध्याकाळी पाज वाजता धर्मराज वर्मा यांना आला. त्यांनी तत्काळ विमानतळावरील सुरक्षा प्रभारी मानसिंह आणि गांधीनगर पोलिसांना याबद्दल कळवले. फोन आल्यानंतर मुंबई येथून भोपाळच्या दिशेने विमान जाणार होती. यासाठी बॉम्ब शोध पथकाला सुद्धा सतर्क राहण्यास सांगण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता विमान लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी अतिरिक्त साधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले.(गुजरात: सावत्र आई कडून 2 मुलांची पाण्यात बुडवून हत्या, गुन्ह्याचा पश्चाताप होताच सांगितले सत्य)

तर क्रमांक ट्रेन केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव उज्जवल जैन असे आहे. त्याने फोन केल्यानंतर आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. पोलिसांच्या मते तरुण आधी भोपाळ येथे राहत होता. त्याची आई शिक्षिका आहहे. भोपाळ मध्ये राहणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल आहे. चौकशी दरम्यान त्याने आपली चुकी कबुल केली नाही. धमकीचा फोन आल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली. बॉम्ब आणि डॉग स्क्वाड यांना सतर्क राहण्यास सांगितले.