Photo Credit - File Image

तिरुअनंतपुरम: केरळ पोलिसांनी चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography) पसरविणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या नियोजित कारवाईत एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह 28 जणांना अटक केली आहे. अश्लीलता पसरवण्यासाठी केरळ पोलिसांनी (Kerala Police) 370 गुन्हे दाखल केले असून आरोपींकडून 420 साधनेही जप्त करण्यात आली आहेत. (Pregnant Elephant Death in Kerala: आरोग्य मंत्रालयाचे मिडिया सल्लागार आणि एका पत्रकाराने ट्विटद्वारे कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय 'अमजत अली आणि थमिम शेख' यांची नावे आरोपी म्हणून केली घोषित; नंतर डिलीट केली पोस्ट )

या संपूर्ण कारवाईचे समन्वय केरळ पोलिसांच्या सायबरडोमने केले असून त्याचे नाव 'पी-हंट' असे ठेवले आहे. हे राज्यभरातील 477 ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले. पोलिस पथकात असे आढळले आहे की अटक केलेल्यांनी 5 ते 16 वर्षे वयोगटातील लहान मुलांची अश्लील छायाचित्रे इतर लोकांना पाठविली होती. ही छायाचित्रे आरोपींसह राहणार्‍या मुलांची होती. ज्या खटल्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात 17 वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे जो अशा प्रकरणात तिसऱ्यांदा पकडला गेला आहे. (Severely Acute Malnourished: भारतामधील 9.2 लाखाहून अधिक मुले तीव्र कुपोषित; उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधिक कुपोषण, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती)

आरोपींमध्ये आयटी व्यावसायिक आणि मोबाइल फोनच्या व्यवसायात असलेल्या लोकांचा ही समावेश आहे.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केरळ पोलिसांनीही अशीच कारवाई केली होती आणि त्यावेळीही गुन्हे आणि अटक नोंदविण्यात आली होती. ऑपरेशन पी-हंटद्वारे आतापर्यंत सुमारे 500 लोकांना अटक करण्यात आली आहे.