गुजरात: सावत्र आई कडून 2 मुलांची पाण्यात बुडवून हत्या, गुन्ह्याचा पश्चाताप होताच सांगितले सत्य
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

गुजरात (Gujrat) राज्यातील सटे प्रदेशातील डुंगरपुर जिल्ह्यातील रामसागडा ठाणे परिसरात एक दृहय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शरम गावात एका सावत्र आईने आपल्या दोन लहान मुलांना पाण्याने भरलेल्या टबात बुडून ठार केले. ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. मात्र आरोपी सावत्र आईला तिच्या गुन्ह्याचा पश्चाताप होताच तिने सत्याचा खुलासा केला आहे. यावर पोलिसांनी मुलांचे पुरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन केले.(धक्कादायक! 14 वर्षांच्या मुलासोबत पळून गेली दोन मुलांची आई; लैंगिक संबंधही ठेवले, POSCO अंतर्गत गुन्हा दाखल)

रामसागडा पोलीस ठाण्यानुसार घटना 3 जूनची असल्याचे सांगितले जात आहे. बद्री या नावाच्या व्यक्तीची पहिली बायको कोणाबरोबर तरी निघून गेली. बद्रीला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. मुलांना बायकोने बद्री याच्याकडेच सोडून पळ काढला. दुर्गा हिच्यासोबत बद्री याने दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते. बद्री आणि त्याचे वडिल मजूरी करण्यास्तव गुजरात येथे राहत होते.

तर 3 जूनच्या दुपारी दुर्गा आपल्या सावत्र मुलांना घेऊन बाथरुमध्ये गेली. तेथे पाण्याने भरलेल्या एका टबात तिने दोघांना बुडवून त्यांची हत्या केली. दुर्गाने नातेवाईकांना आणि गावातील लोकांना मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर 5 जूनला दुर्गा ही काही न सांगता कुठेतरी निघून गेली. तर 6 जूनला ती घरी आली तेव्हा तिला यामागील कारण विचारले असता ती जोरजोराने रडू लागली. तेव्हाच तिने मुलांची हत्या केल्याचे सत्य समोर आणले. सावत्र मुलांच्या पालपोषणाच्या जबाबदारी पासून दूर राहण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे कबुल केले. हे कळल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दुर्गा हिला अटक केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि डेप्युटी सुद्धा तेथे पोहचले. त्यांनी पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यास सांगितले आणि जिल्हा रुग्णालयातील मॉच्युरी येथे मृतदेह नेले. तेथे दोन्ही मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची अधिक चौकशी केली जात आहे.