धक्कादायक! 14 वर्षांच्या मुलासोबत पळून गेली दोन मुलांची आई; लैंगिक संबंधही ठेवले, POSCO अंतर्गत गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कोरबामध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 32 वर्षीय विवाहित महिलेने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. इतकेच नव्हे तर ही महिला या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात इतकी वेडी झाली की, ती या अल्पवयीन मुलासह पळून गेली. ही बाब कोरबा जिल्ह्यातील माणिकपूर चौकी क्षेत्रातील असून सध्या संपूर्ण जिल्ह्यात याचीच चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे या महिलेला दोन मुले आहेत. मुलाच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना जांजगीर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिला तुरूंगात पाठविले आहे.

या महिलेच्या नवऱ्यानेही पोलिसात पत्नी गायब असल्याची तक्रार नोंदवली होती. चौकशी दरम्यान दोघांच्याही मोबाईलमधून अश्लील फोटो जप्त केले आहेत. झीन्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. दादरखुर्द गावात राहणारी एक विवाहित महिला शेजारी राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांमधील प्रेमप्रकरण इतके वाढले की, या दोन मुलांच्या आईने तिच्या अल्पवयीन प्रियकरासह पळून जाण्याची योजना आखली. 25 मे रोजी संधी पाहून दोघांनीही गावातून पळ काढला. जेव्हा महिलेचा नवरा घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची पत्नी घरात नव्हती. त्यानंतर पतीने पोलिसांत पत्नी गायब असल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी शोध सुरु केला असता समजले की, मुलगा जांजगीर जिल्ह्यातील नवागढ़ येथे आपल्या मामाच्या घरी आहे. याची माहिती मामानेच पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नवागढ़ गाठले आणि दोघांनाही मामाच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुलाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याबरोबर पळून गेल्याची कबुली दिली. (हेही वाचा: तब्बल 19 लोकांशी लग्न करून महिलेने घातला 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांना गंडा; समोर आला मोठा Marriage Scam)

चौकी प्रभारी माणिकपूर अशोक पांडे म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी पाॅक्सो कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा केला आहे, महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.