पंतप्रधान नरेंद्र मंदी यांच्या फोटोसोबत छेडछाड केल्यामुळे एका तरुणाला चांगलीच शिक्षा भोगावी लागली आहे. जबीन चार्ल्स असे त्याचे नाव असून तामिळनाडू मधील कन्याकुमारी जिल्ह्यातील राहणारा हा तरुण आहे.
जबीनने पंतप्रधान मोदी यांच्या एका फोटोसोबत छेडछाड केली आणि तो फेसबुकवर पोस्ट केला. याची शिक्षा म्हणून जबीनला आता एका वर्षासाठी सोशल मीडियापासून दूर रहावं लागणार आहे. त्यामुळे सर्व नेटकरी मंडळींनी असं काही करण्यापासून जरा सावध राहा.
कन्याकुमारीमधील वाडसरी पोलिसांनी जबीन याच्या विरोधात 11 ऑक्टोबर रोजी भा.दं.वि कलम 5050 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 27 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळवण्यासाठी जबीन मद्रास हायकोर्टात गेले. आपण पुढचं एक वर्ष सोशल मीडियापासून दूर राहू, असं प्रतिज्ञापत्र त्याने कोर्टासमोर सादर केलं आहे.
कोर्टाने जबीनचा जामीन मंजूर केला असला तरी पुढील एक वर्षात तो पुन्हा सोशल मीडिया वापरताना आढळून आला, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येणार असल्याचा निर्देश कोर्टाने दिला आहे. तसेच या प्रकरणात जबीन यांनी कोर्टात लेखी माफीनामा द्यावा, असं जस्टिस जी. आर. स्वामिनाथन यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश: PUBG गेम खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्याने विद्यार्थ्याने केले विष प्राशन
जबीनने एक महिन्यापूर्वी ती पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर भाजप पदाधिकारी नांजिल राजा यांनी जबीनच्या विरोधात तक्रार दाखल केली.