Mahadev Betting App Case: अभिनेता Sahil Khan छत्तीसगढ मधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Actor Sahil Khan (PC - Instagram)

महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) च्या प्रचार आणि प्रसार प्रकरणी अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छत्तीसगढमध्ये (chhattisgarh) जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले असून आता मुंबई मध्ये आणले आहे. दरम्यान साहिलने मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court ) अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती पण कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अ‍ॅप प्रकरणात 31 पेक्षा अधिक लोकांच्या विरूद्ध माटूंगा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "द लायन बुक ॲप" नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हादेखील भागीदारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्यानंतर तो पोलिसांच्या रडार वर आला होता.

साहिलचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर तो मुंबई मधून फरार झाला होता. नंतर गोवा, कर्नाटक, हैदराबाद करत तो छत्तीसगड मध्ये पोहचला होता. मुंबई पोलिस त्याच्या मागावर होते. साहिल हैदराबाद मधून छत्तीसगडच्या जगदलबपूर मध्ये आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुंबई: अभिनेता Manoj Patil याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अभिनेता Sahil Khan सह अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल .

महादेव बेटिंग अ‍ॅप मध्ये 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून चालवली जात होती. यामध्ये सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गेले. त्याचप्रमाणे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 पेक्षा अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेल्याची माहिती समोर आलेली आहे.