Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या होशंगाबाद (Hoshangabad) जिल्ह्यातील पिपरिया (Pipariya) भागात विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad)  नेते रवी विश्वकर्मा (Ravi Vishwakarma) यांची अज्ञातांकडून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विश्वकर्मा हे विश्व हिंदू परिषदेची बैठक उरकून होशंगाबाद येथून पिपरिया येथे जात होते, यावेळी रेल्वे पुलाच्या खाली त्यांच्या वर अज्ञातांनी काठी आणि रॉड व धारदार हत्यारांनी ने हल्ला केला, यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, विश्वकर्मा यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला आहे.साधारण संध्याकाळी 6 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असून जवळपास 20 मिनिटे हे हल्लेखोर विश्वकर्मा यांना मारहाण करत होते. यावेळी मारहाणीत विश्वकर्मा यांचा मृत्यू जात नसल्याने चाकूने भोसकून, गोळ्या झाडून या अज्ञातांनी त्यांना ठार केले.

रवी विश्वकर्मा यांचा मृतदेह सध्या पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या कोणत्यातरी जुन्या वादातून झाली असल्याचा सुद्धा पोलिसांना अंदाज आहे मात्र नेमक्या कोणी ही हत्या केली आणि का या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, ज्या वेळी हा हल्ला झाला तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे दुसरे नेते राजकुमार सुद्धा याच गाडीत उपस्थित होते. या हल्ल्यात राजकुमार सुद्धा जखमी झाले आहेत. यापूर्वी सुद्धा याच भागात अनेक असे प्रसंग घडले आहेत.