Madhya Pradesh Couple Takes Wedding Pheras in Ratlam Wearing PPE Kits (Photo Credits: ANI)

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. अनियंत्रित कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनसारख्या निर्बंध अनेक राज्यात लागू आहेत. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे सामाजिक मेळाव्यास परवानगी नाही. तथापि विवाह आणि अंत्यसंस्कारासंदर्भात अटींसह सूट आहेत. विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कारात किती लोक सहभागी होऊ शकतात या संदर्भात राज्य सरकारकडून वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत.मध्य प्रदेश देखील कोरोनामुळे त्रस्त आहे. येथेही दररोज 11-12 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. (लस न देताच इंजेक्शन काढून घेतल्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही; BMC ने दिले स्पष्टीकरण )

मध्य प्रदेशातील रतलाममधून लग्नाचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. येथे वधू-वर दोघांनी पीपीई किट परिधान करून लग्नासाठी सात फेरे घेतले आहेत.वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वधू आणि वर पीपीई किटमध्ये फेरे घेत आहेत. तेथे उपस्थित असलेले दोन - तीन लोकांनीही पीपीई किट परिधानकेलेले आहे.

खरं तर हे असे करण्यात आले त्याचे कारण आहे लग्नापूर्वी वराचा कोविड -19 चा अहवाल सकारात्मक आला. एएनआयशी बोलताना रतलामचे तहसीलदार म्हणाले की, १ एप्रिल रोजी वराचा कोविड अहवाल सकारात्मक आला आम्ही लग्न थांबविण्यासाठी येथे पोहोचलो, पण लग्न करण्याची विनंती केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे लग्न केले गेले. यावेळी जोडीला पीपीई किट्स घातली गेली ज्यामुळे संक्रमणाचा प्रसार होण्याचा धोका नाही. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.कोरोना काळात आपण यापूर्वीही अशा अनेक अनोखे विवाहसोहळे पाहिले आहेत . काही दिवसांपूर्वीच असाच एक विवाह केरळच्या अलाप्पुझामध्येपार पडला.कोरोनाने पीपीई किट परिधान केलेल्या वर वधूने  लग्न केले. त्यानंतर, वधू-वर रूग्णालयात दाखल झाले या खास लग्नासाठी अधिका्यांनी विशेष परवानगी दिली होती.