देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वेगाने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच उत्तर प्रदेशात कोरोनाने थैमान घातले असून हिच परिस्थिती लखनौ ते वाराणसी पर्यंत सारखीच आहे. रुग्णालयात बेड्ससह ऑक्सिसन आणि औषधांचा साठा अपुरा पडत आहे. गुरुवारी लखनौ मध्ये बेड न मिळाल्याने एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेरच आपले दु:ख व्यक्त केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.(Coronavirus in India: देशात आज 3,32,730 नव्या कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ! 2,263 रुग्णांचा मृत्यू)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लखनौ मधील 61 वर्षीय निर्मल याची तब्येत बिघडली होती. कोविड कमांड सेंटरने त्याला करियर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितले. मात्र तेथे रुग्णाला दाखल करुन घेतले नाही. रुग्णालयाने त्याच्या नातेवाईकांकडे सीएमओचे रेफरल लेटर मागितले. परंतु नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घ्यावी अशी वारंवार विनवणी केली. खुप तास वाट पाहिल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला.
तर गुरुवारी लखनौ मध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांसाठी खड्डा खोदणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लखनौ डालीगंज येथील स्मशानभुमीत काम करणारा बाबू याचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्याला उपचार मिळाले नाही. गेल्या काही दिवसांपासून बाबू सातत्याने मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खोदत होता आणि कोरोनाच्या रुग्णांना तेथे पुरत होता.(Rajkot: आता रुग्णालयातील बेडचेही व्यवहार; खास एजंटद्वारे 9 हजारांमध्ये होत आहे डील, जाणून घ्या सविस्तर)
डालीगंज स्मशानभुमीचे संचालक उस्मान यांनी असे म्हटले की, बाबू रोज 6 तरी खड्डे खोदत होता. जे मृतदेह रुग्णालयातून येतात ते सील असतात. मात्र जे लोक घरातून येता त्यांची तपासणी केली जात नाही. अशातच बाबू याला कोरोनाची लागण झाली.