LPG सिलेंडर जर तुम्हाला मोफत हवा असल्यास तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण खास ऑफर अंतर्गत तुम्हाला जानेवारी पूर्वी एलपीजी सिलेंडर फ्री मध्ये मिळवता येणार आहे. पेटीएमवर दिल्या जाणाऱ्या स्पेशल ऑफर अंतर्गत तुम्हाला सिलेंडरची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. हे पैसे तुमच्या पेटीएम मध्ये येणार आहेत. तर जाणून घ्या पेटीएमच्या या खास ऑफर बद्दल अधिक.(WhatsApp वर यूजर्स चॅटिंग सोबतचं ऑर्डर करू शकतात वस्तू; Reliance आखत आहे 'ही' नवी योजना)
एलपीजी सिलेंडर फक्त त्याच ग्राहकांना फ्री मध्ये मिळणार हे ज्यांनी पहिल्यांदाच Paytm च्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करणार आहेत. यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये पेटीएम अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. जर तुम्ही पेटीएम मधून तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार असाल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. तुम्हाला जवळजवळ 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक पेटीएमवर दिला जाणार आहे.(जानेवारी महिन्यापासून टीव्ही, फ्रिजसह अन्य घरगुती सामान महागणार, किंमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता)
>>Paytm च्या या ऑफरचा अशा पद्धतीने घ्या लाभ
-प्रथम Paytm App डाऊनलोड करुन ते सुरु करा.
-अॅप सुरु केल्यानंतर Recharge and Pay Bills येथे जावे लागणार आहे.
-येथे Book A Cylinder ऑप्शन निवडावा लागणार आहे.
-आता भारत गॅस, HP गॅस किंवा इंडेन मधील जो तुम्ही वापरता तो निवडा.
-त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा आपला LPG ID टाका.
-तुम्हाला आता पेमेंट ऑप्शन दाखवले जाईल. पण पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर FIRSTLPG हा प्रोमो कोड द्यावा लागणार आहे.
तर पेटीएमची ही ऑफर येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंतच असणार आहे. त्यामुळे याचा फायदा तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमची बुकिंगची रक्कम 500 रुपयांहून अधिक आहे. पेमेंट केल्यानंतर स्क्रॅच कूपन बुकिंगच्या 24 तासात मिळणार आहे. जे तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये स्क्रॅच करावे लागणार आहे. कूपन स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत.