LPG Gas Connection: आगोदर महागाईच्या झळांमध्ये होरपळत असलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे. आता केवळ सिलिंडर गॅसच नव्हे तर नवी जोडणीही महागली (LPG Gas Connection Price Hike) आहे. तुम्ही जर गॅसचे नवे कनेक्शन घेत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारपासून म्हणजेच 16 जूनपासून हे नवे दर लागू केले आहेत. या दरानुसार नवी कनेक्शन जोडणी असलेल तर सिलिंडरच्या किलोनुसार हे दर असणार आहेत. जाणून घ्या, ग्राहकांना नव्या दरांनुसार किती मोजावी लागणार रक्कम.
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनसाठी सुरक्षा रक्कमेत मोठी वाढ केली आहे. ही वाढ तब्बल 750 रुपयांची आहे. याशिवाय तुम्ही जर 14 किलोचा गॅस सिलिंडर घेतला असेल तर तुम्हाला अधिकची रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय पाच किलोच्या छोट्या गॅस सिलिंडर जोडणीसाठीही 350 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. याशिवाय नव्या रेग्युलेटरसाठी 100 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
नव्या गॅस जोडणीसाठी इतरचे अधिकचे दर
रेग्युलेटर-250 रुपये
पासबुक- 25 रुपये
पाईप- 150
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणी व्यक्ती एलपीजीचे नवे कनेक्शन घेत असेल तर संबंधित ग्राहकाला 2,200 रुपये द्यावे लागणार आहेत. या आधी याच ग्राहकाला जुन्या दरानुसार 1450 रुपये द्यावे लागत होते. आता नव्या दरांनुसार ग्राहकांना सर्व मिळून एकूण 750 रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. ग्राहकाला गॅसचे नवे एक कनेक्शन घ्यायचे असेल तर एकूण 3,690 रुपये भरावे लागतील. जर एखादा ग्राहक दोन सिलेंडर घेत असेल तर त्यांना अनामत रक्कम म्हणून 4400 रुपये भरावे लागतील.