काही वेळेस विनाकारण करण्यात येणाऱ्या प्रयोगांमुळे मोठी किंमत भरावी लागते. लंडन मध्ये 15 वर्षीय एका मुलाने असे काही केले त्यामुळे त्याच्या गुप्तांगात चक्क USB केबल अडकली गेली. ही केबल वायर काढण्यासाठी त्याच्यावर मोठी सर्जरी करण्यात आली. डॉक्टरांनी असे म्हटले की, मुलगा युएसबी केबल वापरुन आपल्या गुप्तांगाची लांबी मोजत होता.(लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
रिपोर्ट्सनुसार, त्याचा हा प्रयोग धोकादायक ठरला आणि आधीपासून गाठ असलेली केबल ही त्याच्या गुप्तांगात अडकली गेली. युएसबी केबलच्या दोन्ही बाजू त्याच्या गुप्तांगात गेल्याने त्या बाहेर काढणे मुश्किल झाले. युएसबी केबल गुप्तांगातून बाहेर काढण्याचा त्याने खुप प्रयत्न केला. पण त्याच्या गुप्तांगातून लघवी ऐवजी रक्त बाहेर पडू लागले. हे पाहुन मुलगाच्या घरातचे अधिकच घाबरले आणि त्याला तातडीने रुग्णालयात उपचाराठी नेले.
युरोलॉजी केस रिपोर्टनुसार, युसएबी केबल मुलाच्या गुप्तांच्या खुप आतमध्ये घुसली होती. डॉक्टरांना ती स्पेशल टूलच्या माध्यमातून सुद्धा बाहेर काढणे मुश्किल झाले. मुलाची प्रकृती बिघडत असल्याचे पाहता त्याला लगेच युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल, लंडन येथे ट्रान्सफर करण्यात आले. मुलाने आग्रह केला की, त्याच्या आईच्या अनुपस्थितीत हे ऑपरेशन केले जावे. डॉक्टरांनी म्हटले की, गुप्तांगाची लांबी मोजण्यासाठी मुलाने असे केले.(Death Of Chicken In Maharajganj: कोंबडी मेली, माजी आमदार पूत्राकडून पोलीसत तक्रार, थेट हत्येचाच गुन्हा)
एक्स- रे रिपोर्टमधून असे दिसले की, केबलची साइज आणि पोजिशन बद्दल त्यांना कळले. त्यानंतर लगेच सर्जरीसाठी पाठवण्यात आले. सर्जनने चीरा लावून प्रथम गाठ काढली आणि त्यानंतर युएसबी केबलचा उर्वरित बाहेर काढला. सर्जरी दरम्यान, कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. प्रकृती सुधारल्यानंतर मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. सर्जरीच्या दोन आठवड्यानंतर फॉलो अप स्कॅनमध्ये डॉक्टर्सने म्हटले मुलाला कोणतेही स्थायी नुकसान झालेले नाही. मात्र भविष्यात त्याला सातत्याने मॉनिटर करण्याची गरज पडेल.
डॉक्टरांनी असे म्हटले की, अशा प्रकारची वस्तू गुप्तांगात अडकणे अत्यंत धोकादायक ठरु शकते. तुम्हाला लघवी करण्यासाठी समस्या येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग करण्यापासून दूर रहावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.