Representational Image (Photo credits: PTI)

2019 या वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणूकांचे नगारे वाजणार आहेत. त्यामुळे राज्यकर्ते त्याचबरोबर देशातील जनतेसाठी देखील हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणूकांदरम्यान काही राज्यांच्या विधानसभा निवडणूका होण्याचीही शक्यता आहे.

सध्या सुरु असलेल्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 ला संपणार आहे. त्यापूर्वी आगामी निवडणूकांची प्रक्रिया आयोगाने सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकांसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणूका ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी 2004, 2009, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान जाहीर झाला होता. 2018 मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, मिझोरम, तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणूनका 2018 मध्ये पार पडल्या.