Laxmi Vilas Bank Update: देशातील 90 वर्षांहून जुनी असलेली लक्ष्मी विलास बँक आर्थिक अडचणीत सापडल्याने केंद्राने त्याचे DBS बँक इंडिया लिमिडेट मध्ये विलीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र लक्ष्मी विलास बँकेच्या विलीकरणासाठी बँकेच्या प्रमोटर्सनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यांनी या विलीकरणासाठी स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. परंतु हायकोर्टाने बँकेच्या विलीकरणासाठी स्थगिती देण्याच्या मागणीला नकार दिला आहे.(Laxmi Vilas Bank Update: लक्ष्मी विलास बँक चे DBIL मध्ये विलिकरण करण्यास मंजुरी, येत्या 27 नोव्हेंबर पासून कामकाज पुन्हा सुरु होणार)
लक्ष्मी विलास बँकेच्या प्रमोटर्सनी विलीकरणासाठी हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेवर कोर्टाने सुनावणी करत त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच सुनावणी वेळी आरबीआयच्या बाजूने वकील रवी कदम यांनी म्हटले की, बँकेतील खातेधारकांच्या हितासाठीच निर्णय घेण्यात आला आहे. प्रमोटर्सच्या आव्हानाला आता तरी नकार दिला असून सुनावणी 14 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.(Lakshmi Vilas Bank च्या ग्राहकांचे पैसे सुरक्षित; RIB नियुक्त प्रशासकांचा ठेवीदारांना दिलासा)
तर सरकारच्या या निर्णयामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या 20 लाख खातेधारकांना दिलासा मिळणार आहे. तर 4 हजार सेवा सुद्धा सुरक्षित राहणार आहेत. पण यापूर्वी सरकारने 17 नोव्हेंबर रोजी आरबीआयला आर्थिक संकटात पडलेल्या लक्ष्मी विलास बँकेच्या कामकाजावर 30 दिवसांपर्यंत बंदी घालावी असा सल्ला दिला होता. त्याचसोबत खातेधारकांना त्यांच्या खात्यामधून महिन्याभरात फक्त 25 हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. तसेच लक्ष्मी विलास बँकेचे बोर्ड सुद्धा बरखास्त आरबीआयकडून करण्यात आले होते.