Kurla Accident | X @ANI

कुर्ला (Kurla) परिसरामध्ये 9 डिसेंबरला रात्री 9.30 च्या सुमारास बेस्ट बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि भारधाव बसने 7 जणांचा हकनाक बळी घेतला. दरम्यान या अपघाताच्या वेळीस माणूसकीला देखील काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गाडीच्या चाकाखाली आलेल्या महिलेच्या हातामधील बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडीयात सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये हेल्मेट घातलेला एक माणूस महिलेच्या हातातील बांगड्यांना काढून घेऊन जाताना दिसत आहे. यावरूनच आता पोलिसांनी मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 55 वर्षीय मृत महिला कन्नीस अन्सारी यांच्या हातातील बांगड्या चोरण्यात आल्या आहेत.

सोशल मीडीयामध्ये अंसारींच्या हातातील बांगड्या चोरीला जात असल्याचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. 9डिसेंबरच्या या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला राज्य सरकार, बीएमसी कडून मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार सुरू आहेत. नक्की वाचा: Kurla Bus Accident Video: अपघातापूर्वी भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बस मध्ये काय होती स्थिती? चालकही खिडकीतून पळाल्याचं CCTV फूटेज मध्ये कैद (Watch Video) .

कुर्ला अपघात प्रकरणी मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरल्या

बेस्ट बस चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून हा अपघात कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. 1 डिसेंबरला बेस्टच्या सेवेमध्ये आलेल्या चालकाला पुरेसे प्रशिक्षण नसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितले जात आहे.