कृष्णभक्तांसाठी कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami ) दिवस खास असतो. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमीच्या तिथीवर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. कृष्णाच्या मंदिरामध्ये या निमित्ताने पाळणा सजवून त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवून हा जन्मोत्सव साजरा केला जातो. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Images, Quotes द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. सोशल मीडीयामध्ये तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांना ही शुभेच्छापत्र शेअर करू शकता.
श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार म्हणून मानले जातात. त्यामुळे देशभर कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. महाराष्ट्रातही त्याचा उत्साह असतो. अष्टमीच्या रात्री कृष्णजन्म आणि दुसर्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दही हंडी फोडली जाते. Janmashtami 2023: जन्माष्टमी तारीख, पूजेची वेळ आणि शुभ मुहूर्त कोणता? भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणाऱ्या हिंदू सणाचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या .
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेकजण एक दिवसाचा उपवास ठेवतात. रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो. प्रसादामध्ये दहीकाला बनवला जातो. दुसर्या दिवशी दहीहंडीचा थरारक खेळ रंगतो.