लिंग, जात किंवा कोणत्याही धर्म, पंथाच्या भावना दुखावणारे अश्लील किंवा अपमानास्पद पोस्टर्स (Offensive Posters), संदेश किंवा छायाचित्रे प्रदर्शित करणाऱ्या बस आणि ट्रक मालकांवर कारवाई (Legal Action) करण्याची घोषणा कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) केली आहे. जर कोणाच्या वाहनावर अश्लिल अथवा कोणाच्या भावना दुखावणारे संदेश असतील तर ते त्वरीत काढून टाकावेत अन्यथा वानहनाच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यांच्यावर मानहानी (Defamation) प्रकरणी कारवाई केली जाईल. महिलांबद्दल आक्षेपार्ह संदेश लिहिलेले दोन ट्रक आढळून आल्यानंतर पोलिसांनी हा ईशारा दिला आहे.
दोन वाहनांवर महिलांबाबत असभ्य टीप्पणी
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात म्हटले आहे की, आम्ही काही वाहनचालकांपासून सुरुवात करू शकतो, परंतु कायदा सर्वांना लागू आहे. लालबाजार येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनांवर अश्लिल, भावना दुखावणारे अथवा प्रक्षोभक संदेश लिहीणे, प्रदर्शीत करणे हे कायद्यानुसार मानहानी मानले जाऊ शकते आणि त्याविरोधात दंड होऊ शकतो. महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणारे दोन ट्रक पोलिस अधिकाऱ्यांना सापडल्यानंतर हा निर्णय रविवारी घेण्यात आला. चालकांना तात्काळ आक्षेपार्ह मजकूर हटविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Kolkata Suicide Case: माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही लिहून उचलले टोकाचे पाऊल, नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या)
पोलीस करणार जनजागृती
कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांच्या फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहीली आहे. ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टला अनुसरुन नेटीझन्सनी अनेक प्रश्न विचारले आहेत. काहींनी म्हटले आहे की, केवळ वाहनेच कशाला, अनेक लोक आपल्या टी-शर्ट आणि शरीरावरही अनेकदा अश्लिल, द्वैआर्थी, भावना दुखावणारे संदेश लिहीतात. अनेकदा तसे आढळून येते अशा वेळी, या मंडळींनाही कायदेशीररित्या बदनामीकारक म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते का? तसेच, त्यांच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते का, असा प्रश्न करण्यात आला. यावर पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, ते लवकरच या विषयावर अधिक जनजागृती करण्याचे काम करतील.
कोलकाता पोलिसांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, नुकतीच आम्हाला काही कार आणि ट्रकवर महिलांबाबत आक्षेपार्ह विचार व्यक्त करणारी आणि काही लोकांच्या भावना दुखावणारी सामग्री आढळून आली. ही आक्षेपार्ह सामग्री लेखण हटविण्याच्या सूचना आम्ही सदर वाहनांच्या चालकांना केल्या आहेत. एका ठिकाणी कारवर आढळून आले की, सापावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, पण महिलांवर नाही. अनेकांना हा संदेश केवळ विनोद वाटत असला तरी, त्यापाठीमागे महिलांविषयी चुकीची भावना ठेवल्याचे आढळून येते. त्यामुळे अशा संदेशांवर कारवाई केली जाणार आहे.