
Kolkata Knight Riders vs Punjab Kings, 44th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 44 वा सामना (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात 26 एप्रिल (शनिवार) रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली असलेल्या पंजाब किंग्ज संघाने चांगली कामगिरी केली आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अंजिक्य राहणेच्या खांद्यावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जायचे आहे. (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Points Table Update: चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने नोंदवला तिसरा विजय; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)
हेड टू हेड रिकॉर्ड (PBKS vs KKR Head To Head)
किती वाजता सुरु होणार सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल 2025 चा 44 वा सामना शनिवार, 26 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर KKR विरुद्ध PBKS आयपीएल 2025 चा 44 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.