जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी हल्ल्यातील धार्मिक ओळख तपासणीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पीडितांना खरच त्यांचा धर्म विचारला गेला होता का, याबाबत काही ठोस माहिती नाही, असे पवार म्हणाले आहेत. यासह त्यांनी केंद्र सरकारच्या दहशतवाद संपल्याच्या दाव्यावर टीका करत, हल्ल्याने सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी उघड झाल्याचे सांगितले आणि तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.

याला प्रत्युत्तर देत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली केली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मला कोण काय म्हणाले याच्या वादात पडायचे नाही. ही वाद करण्याची वेळ नाही. पीडित कुटुंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत, त्यांनी जे काही पाहिले ते सांगितले आहे. ज्यांना हे मान्य करायचे असेल ते मान्य करतील. आपल्या इथे काही लोक असे आहेत ज्यांना प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे, त्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही, मला अशा लोकांची कीव येते.’ (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा निर्णय)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस यांची टीका: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)