Dog | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबाला केरळ सरकारने (Kerala Government) मोठी आर्थिक मदत केली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला केरळ राज्यातील उत्तर कन्नूर जिल्ह्यात (Kannur District) मुझाप्पिलंगड (Muzhappilangad) येथे भटक्या कुत्र्यांनी एका दिव्यांग मुलावर हल्ला चढवला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. निहाल असे या मुलाचे नाव आहे. केटिनकम येथील त्याच्या घरापासून 300 मीटर अंतरावर गंभीररित्या जखमी आवस्थेत आढळून आला. ही घटना 11 जून रोजी घडली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यना त्याचा मृत्यू झाला.

केरळ सरकारने कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झालेल्या दिव्यांग मुलाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. केरळ सरकारने मुख्यमंत्री आपत्ती निवारण आणि सहाय्यता निधी (CMDRF) मधून रुपये 10 लाखांची आर्थिक मदत मिळेल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा, Rape on Dog: मुंबईमध्ये फूड डिलिव्हरी बॉयचा कुत्र्यावर बलात्कार; व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून अटक)

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाने केरळ प्रशासकीय सेवा (KAS) चे संक्षिप्त नाव "KAS" वापरण्यासही मंजुरी दिली आहे आणि नव्याने सुरू झालेल्या राज्य प्रशासकीय सेवेअंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे, असे त्यात म्हटले आहे. मंत्रिमंडळाने या वर्षीच्या बकरीद सणासाठी राज्यात 28 आणि 29 जून हे सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.