पवई पोलिसांनी (Powai Police) शनिवारी एका 28 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला मॉलमध्ये कुत्र्यावर बलात्कार (Rape) केल्या प्रकरणी अटक केली. बॉम्बे अॅनिमल राइट्स या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्या आणि प्राणी कार्यकर्त्या मिनू शेठ यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. शेठ या दररोज परिसरातील भटक्या प्राण्यांना खायला देतात, ज्यामध्ये अत्याचार झालेल्या कुत्र्याचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी बॉम्बे अॅनिमल राइट्सचे अध्यक्ष विजय मोहन्नी यांनी शेठ यांना एक व्हिडिओ पाठवला होता, ज्यात आरोपी हिरा पन्ना मॉलच्या बाहेरच्या बाल्कनीच्या दुसऱ्या मजल्यावर सहा महिन्यांच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसत होता. मोहन्नी यांनी घडल्या प्रकाराबाबत फूड डिलिव्हरी बॉयविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती शेठ यांनी केली. या कुत्र्याला मॉलमधील एका रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याने पाळले होते.
मिड-डेच्या वृत्तानुसार, आरोपी अनेक दिवसांपासून या कुत्र्यावर बलात्कार करत होता. त्याला हे कृत्य करताना पाहून एका दुसऱ्या फूड डिलिव्हरी बॉयने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो मित्र आणि इतर सहकाऱ्यांना पाठवला. त्यानंतर हा व्हिडिओ प्राणी कार्यकर्ते विजय मोहन्नी यांच्यापर्यंत पोहोचला. पवईतील ही दुसरी घटना असल्याचे मोहन्नी यांनी सांगितले. याच ठिकाणी गेल्या वर्षी नुरी नावाच्या कुत्र्यावर एका नराधमाने बलात्कार केला होता, शिवाय कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठीही घुसवली होती. (हेही वाचा: चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू; पहा अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य)
मोहन्नी यांनी सांगितले की कुत्र्याची सध्या वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या प्रायव्हेट पार्टला सूज आहे. तसेच, तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला आयसीपी आयपीसी कलम 377 (अनैसर्गिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अंतर्गत अटक केली आहे. आरोपीला वांद्रे न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.