Kerala Assembly | (Photo Credits: ANI)

सोने तस्करी प्रकरणात (Kerala Gold Smuggling Case) विधानसभा अध्यक्ष पी श्रीरामकृष्णन (P Sreeramakrishnan ) यांना हटविण्याबाबतचा एक प्रस्ताव केरळ विधानसभेत (Kerala Assembly) दाखल गुरुवारी (21 जानेवावरी) दाखल झाला आहे. आययूएमएल आमदार एम उमेर यांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावार सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपले म्हणने मांडले. त्यानंतर या विषयावर अध्यक्षांना आपले मत मांडण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ देण्यात आला.

प्रस्तावावर आपली बाजू मांडताना भाजपचे केरळमधील एकमेव आमदार ओ राजगोपाल यांनी म्हटले की, विधानसभेत सर्व 140 सदस्यांसाठी अध्यक्ष हे आदर्श असायला हवेत. परंतू, अध्यक्षांवर तस्करांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप अत्यंत दुर्दैवी आहे.

विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी म्हटले की, पी श्रीरामकृष्णन हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी विधानसभा अध्यक्षांची खुर्ची सांभाळली असताना त्यांच्यावर तस्करांसोबत संबंध ठेवल्याच्या आरोपाने डाग लागला. विधानसभा हे लोकशाहीचे मंदिर आहे. कोणत्याही अध्यक्षांविरुद्ध सोने तस्करी प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप अथवा प्रकरण या आधी कधीच पुढे आले नाही.

अध्यक्षांवर झालेल्या आरोपांना उत्तर देतना आणि त्यांचा बचाव करताना मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे की, सोने तस्करी प्रकरणात आरोपींकडून न्यायालयात देण्यात आलेल्या 164 जबाबांमध्ये अद्याप काहीच पुढे आले नाही. इतकी महिने तपास यंत्रणा आरपींकडे चौकशी करत आहे पण काहीही ठोस पुढे आले नाही. अशा स्थितीत आरोपींच्या जबाबांवर विश्वास कसा ठेवायचा. तपास यंत्रणांनी जाणीवपूर्व केरळ विधानसभा अध्यक्षांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. तसेच, विरोधकांकडून या प्रकाराचे समर्थन केले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.