धक्कादायक! काश्मीरी युजर्सना Whatsapp काढतंय ग्रुपबाहेर; नागरिकांकडून सोशल मीडियावर स्क्रिन शॉट शेअर
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) राज्यातून अनुच्छेद 370 (Article 370) मध्ये बदल करुन आता जवळपास चार महिने लोटले. या काळात असलेली जमावबंधी शिथील करत जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, सरकारनेही दावा केला आहे की, या परिसरातील सरकारी सेवा आणि जनजीवन सर्वसामान्यपणेच सुरु आहे. असे असले तरी, देशभरातील नागरिकांच्या नित्याची गोष्ट ठरलेल्या इंटरनेटवर मात्र इथे अद्यापही बंदी आहे. अशातच वृत्त आले आहे की, ज्या Whats app ग्रुपमध्ये काश्मीरी नागरिकांचा समावेश आहे. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून (WhatsApp Group) कश्मीरी नागरिकांचे नंबर स्वताहूनच बाद होत आहेत. म्हणजेच अकार्यरत होत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून आपले क्रमांक अचानक गायब होऊ लागल्याने काश्मीरी युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे काश्मीर खोरेच नव्हे तर खोऱ्याबाहेर इतर ठिकाणी असलेल्या नागरिकांचेही क्रमांक व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाद होत आहेत. buzzfeed news ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार ध्यानात आल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर असे अनेक स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ज्यात कश्मिरी युजर्सचे क्रमांक त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाद होत आहेत. कश्मीर मधून अनुच्छेद 370 हटवल्याला आता बराच काळ लोटला. तरीही अद्याप या ठिकाणी इंटरनेट आणि मोबाईल सेवा सुरु नाही. इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद असल्याला इथे आता 120 दिवस पूर्ण झाले आहेत. (हेही वाचा, WhatsApp मधील कॉल संबंधित दोन नव्या फिचर्समध्ये बदल, जाणून घ्या)

ट्विट

दरम्यान, या परिसरात शाळा-महाविद्यालयांशिवाय सरकारी कार्यालये सामान्यपणे सुरु आहेत. परंतू, सरकारने म्हटले आहे की, सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इथे मोबाईल आणि इंटरनेट सेवा अद्याप सुरु केली नाही.

ट्विट

अनुच्छेद 370 मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केल्यानंतर आता जम्मू कश्मीर आणि लद्दाक हे प्रदेश वेगवेगळे करुन त्यांना केंद्रशासीत प्रदेशांचा दर्चा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य झाली की लगेच या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल.