WhatsApp मधील कॉल संबंधित दोन नव्या फिचर्समध्ये बदल, जाणून घ्या
WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच ट्रेन्डिंग फिचर्स घेऊन येते. मात्र आता व्हॉट्सअॅप मधील कॉल संबंधित दोन नव्या फिचर्समध्ये बदल होणार असल्याची माहिती WaBetaInfo यांनी दिली आहे. त्यानुसार एखाद्या युजर्सला व्हॉट्सअॅपवरुन कॉल केल्यास आणि ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असल्यास तुम्हाला कॉल वेटिंगचा ऑप्शन दाखवला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉलिंगवर आता कॉल वेटिंग सुद्धा कळणार आहे.

व्हॉट्सअॅप कॉलिंगवरील वेटिंगचे फिचर ios युजर्ससाठी प्रथम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे या वर्जनचा उपयोग करायचा असल्यास ios मधील 2.19.120 अपटेड करावे लागणार आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅपवर कॉल केल्यास वस्त असल्याचा टोन ऐकू यायचा. मात्र आता हे फिचर आल्यानंतर युजर्सला कॉल वेटिंग दिसणार आहे. यामुळे युजर्सला Incoming Call बाबत कळणार आहे.(Facebook Pay या सुविधेमुळे आता Messenger, WhatsApp, आणि Instagram च्या माध्यमातून करू शकाल आर्थिक व्यवहार)

व्हॉट्सअॅपच्या अपडेटनुसार WABetaInfo ने हे सुद्धा सांगितले आहे की, आयओएसच्या या वर्जनमध्ये नवी प्रायव्हसी सेटिंग सुद्धा देण्यात आली आहे. यामध्ये एखादा युजर्स स्वत:ला ग्रुपमध्ये अॅड करण्याबाबत विचारणा केली जाणार आहे. त्याचसोबत Voice Over मोड दरम्यान Braille Keyboard चा वापर करता येणार आहे. त्याचसोबत एखाद्याने जर तुम्हाला ब्लॉक केल्यास त्याबाबत तुम्हाला नोटिस मिळणार आहे. तसेच 'You blocked this contact. Tap to unblock.' असे दाखवले जाणार आहे. तर एखाद्या युजर्सला अनब्लॉक केल्यानंकर लेबल दाखवला जाणार असून त्यामध्ये 'You unblocked this contact' असे दिसणार आहे. यामध्ये खासियत आहे की, ब्लॉक केल्याचे लेबल फक्त ज्या व्यक्तीला ब्लॉक केले आहे त्यालाच दिसणार आहे.