फ़ेसबूक या जगातील लोकाप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता 'फेसबूक पे' ही नवीन व्यवहाराची सेवा सुरू करण्यात आली आहे. नुकतीच अमेरिकेमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती खास ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मेसेंजर, इस्टाग्राम, व्हॉटसअॅप वरून 'फेसबूक पे' च्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. त्याचा वापर करण्यासाठी क्रेडीट आणि डेबिट कार्ड सोबतच पे - पाल सारख्या सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहेत. यासाठी आता क्रेडीट, डेबिट कार्ड आणि पे -पाल सोबत तुमचं अकाऊंट लिंक करणं आवश्यक आहे.
फेसबूक पे च्या माध्यमातून आता युजर पीन क्रमांक, फेस आय डी आणि टच आयडी यांचे देखील कवच लावण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये बायो मॅट्रिक माहिती सेव्ह करत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. लवकरच ही सोय भारतामध्येही लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यानंतर युजर फेसबूक अॅप किंवा फेसबूकच्या वेबसाईटवर सेटिंग्समध्ये जाऊन पेमेंट सेव्ह करा. इथे पहा फेसबूकने दिलेल्या Facebook Pay फीचर बद्दल माहिती
अमेरिकेमध्ये या आठवड्यात फेसबूक आणि मेसेंजर लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती खास ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.