Kartiki Ekadashi 2020: पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी
Pandharpur Photo Credits: Twitter/ PandharpurVR

Kartiki Ekadashi 2020: पंढरपूर (Pandharpur) येथे श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 22 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.(Chhath Puja 2020: मुंबई महापालिकेने समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घातल्यानंतर नागरिकांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया)

राज्यात अनलॉकिंग नुसार मंदिरे पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सुद्धा नियमावली जाहीर केली आहे. अशातच आता विठुरायाच्या कार्तिकी एकादशीला नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदीसह एसटी बस सेवा सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संचारबंदी ही 5 ते 10 किमी अंतरापर्यंत लागू केली जाणार आहे.(Pandharpur Kartiki Wari 2020: यंदाची पंढरपूर कार्तिकी वारी मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले)

दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात येणाऱ्या वारकांनी येऊ नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. त्यामुळे जे वारकरी येतील त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरुनच दिंड्यासह परत पाठवले जाणार आहे. भाविकांनी पंढरपूरात येऊ नये यासाठी 1800 पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवासुविधा मात्र नेहमीप्रमाणे जिल्ह्यात सुरु राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.