Arrest (PC -Pixabay)

सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ (Sex Videos) शेअर केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी रविवारी एका व्यक्तीला अटक केली. प्रतीक गौडा असे आरोपीचे नाव असून त्याला तीर्थहल्ली येथून अटक करण्यात आली. प्रतिकवर अनेक मुलींसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाला अटक केले व त्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपीला आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

डेक्कन हेराल्डच्या मते, आरोपी गौडा हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित विद्यार्थी नेता आहे. अहवालात असे म्हटले आहे की, तो तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा अध्यक्ष होता. शिवमोग्गा एसपी जीके मिथुन कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, ‘तीर्थहल्लीमध्ये काही मुलींसोबत लैंगिक कृत्य करणाऱ्या एका मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून आम्ही त्या मुलाला ताब्यात घेतले आणि आता एफआयआर नोंदवत आहोत. हा मुलगा सेक्स करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि त्यानंतर मुलींना त्रास द्यायचा.’ (हेही वाचा: भोसरी परिसरात घरासमोर थांबलेल्या तरुणीला शिवीगाळ करून विनयभंग; आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल)

अभाविपच्या नेत्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि गौडा याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, प्रतीकला या वर्षीच्या जानेवारीपासून संस्थेतील त्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. तो संस्थेच्या नावाचा अयोग्य वापर करत होता, ज्यामुळे अनेक महाविद्यालयीन मुली आणि इतर व्यक्तींना समस्यांचा सामना करावा लागला होता.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या अनेक नेत्यांनी शनिवारी पोलीस उपअधीक्षक (DySP) कार्यालयाला भेट दिली आणि सोशल मीडियावर लैंगिक व्हिडिओ शेअर केल्याबद्दल गौडा याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची औपचारिक विनंती केली. त्यांनी तरुणींच्या संभाव्य ब्लॅकमेलिंगबद्दल चिंता व्यक्त केली. एनएसयूआयच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पीडितांना संघटनेत सामील होण्यासाठी प्रलोभन देण्यात आले आणि नंतर अश्लील व्हिडीओ बनवले गेले व त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.