Pune Shocker: भोसरी परिसरात घरासमोर थांबलेल्या तरुणीला शिवीगाळ करून विनयभंग; आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल
ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भोसरीतील गवळीनगर येथे घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यातील भोसरी परिसरात घरासमोर थांबलेल्या एका तरुणीला एका नराधमाने शिवीगाळ करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीसोबतच तिच्या आईलाही शिवीगाळ केली. तो वारंवार मुलीचा पाठलाग करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भोसरीतील गवळीनगर येथे घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद मधुकर ठमके (वय22) याच्याविरुद्ध भादंवि कलम 354, 354(c), 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत. (हेही वाचा: Mumbai Shocker: मीरा भाईंदर मध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग, इस्लाम धर्मात जाण्यासाठी धमकावल्याची तक्रार; 2 जण अटकेत)
A shocking incident has come to light from the Bhosari area of Pune where a young woman who was waiting in front of her house, was allegedly abused and molested by a man. The accused also abused the girl and her mother. He repeatedly chased the girl and threatened to make her… pic.twitter.com/mwZVkBSYAL
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

