देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी खुल्या राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी देशभरातील डॉक्टर्स दिवसरात्र काम करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काही समाजकंटकांकढून अत्यावश्यक सेवांचा काळाबाजार करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभुमीवर कर्नाटक येथे एका मेडिकलच्या दुकानावर छापेमारी करत 70 बनावट थर्मामीटर्स जप्त करण्यात आले आहेत.
एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरु येथे एका मेडिकल दुकानावर सेन्ट्रल क्राइम ब्रान्च यांनी धाड टाकली. त्यानुसार मेडिकलमधून 70 इन्फ्रारेड बनवाट थर्मामीटर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत जवळजवळ 10 लाख रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी मेडिकलच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(PM- केअर्स फंड साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी स्वतःच्या बचतीतून दिले 25 हजाराचे योगदान)
Karnataka: Central Crime Branch (CCB) Bengaluru conducted a raid yesterday, at a medical shop in Rajajinagar and seized 70 infrared fake thermometers. Total worth of seizure is about Rs. 10 lakhs. Manager has been taken into custody. Case registered. pic.twitter.com/z8TQdno8Ui
— ANI (@ANI) April 1, 2020
तामिळनाडू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने मदत पुढे केली आहे. तर तिरुचिरापल्ली येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने डॉक्टरांच्या मदतीसाठी एका ह्यूमनॉयड रोबोट ची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांची सेवा करण्यात डॉक्टरांची मदत करेल. विलगीकरण कक्षात रुग्णांपर्यंत औषधं पोहचवण्याचं काम हे रोबोट्स करतील. अशा प्रकारचे 4 रोबोट्स वापरासाठी तयार आहेत. हे रोबोट्स सरकारी हॉस्पिटलमध्ये मदत म्हणून दान करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्यास या रोबोट्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती हॉस्पिटलच्या डिनने दिली आहे.