कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध सुरु असणाऱ्या लढ्यात देशाची आर्थिक बाजू मजबूत असणे अत्यंत आहे हीच गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) ची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत या मध्ये मोठमोठे उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी, सरकारी कर्मचारी, सामान्य जनता या साऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन (Hiraben) यांनी सुद्धा आपल्या वतीने योगदान देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्यांनी पीएम केअर्स फंड मध्ये 25 हजाराची देणगी दिली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम हिराबेन यांनी आपल्या स्वतःच्या बचतीतून दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली. Coronavirus च्या लढाईत मुकेश अंबानी यांचा मदतीचा हात; रिलायन्सकडून PM CARES Fund साठी 500 कोटींची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची निर्मिती करत असल्याचे सांगताच सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या फंडासाठी सढळ हाताने मदत देऊ केली आहे. कोरोनाचा लढा हा आरोग्याशी संबंधित असला तरी त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आकडे जुळवताना देशाची आर्थिक बाजू मजबूत असणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी शक्य होतील तितकी मदत या कार्यात करावी असे आवाहन पंतप्रधांनानी केले होते.
ANI ट्विट
Prime Minister Narendra Modi's mother Hiraba donates Rs 25,000 from her personal savings to #PMCARES Fund. #COVID19 (File pic) pic.twitter.com/N1Z9G1B31C
— ANI (@ANI) March 31, 2020
दरम्यान, अगदी कमीत कमी योगदान देखील अतिशय महत्वाचे असणार आहे असे सांगताना नरेंद्र मोदी यांनी एका व्यक्तीने दिलेल्या 501 रुपयांच्या देणगीचे सुद्धा कौतुक करून एक खास ट्विट केले होते. दुसरीकडे देशभरात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र त्याच वेळी कोरोनातून रिकव्हर होणाऱ्या रुग्णाची संख्या देखील तितकीच आश्वसक आहे. यावेळी लोकांनी घरी राहून, नियमाचे पालन करून सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे असे आवाहन वारंवार केले जात आहे.