कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरुद्ध देशाची लढाई सुरु आहे, यामध्ये आपणही सहभागी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे, या लढ्यात प्रत्यक्ष नाही तर निदान आर्थिक बाजूने मदत करण्याचे अनेकांनी बोलूनही दाखवले होते, यानुसार सर्व प्रकारच्या आर्थिक मदती स्वीकारण्यासाठी पीएम केअर्स या फंडाची (PM Cares Fund) निर्मिती करण्यात आली आहे. जनतेने त्यात सढळ हस्ते शक्य तेवढी कमी अधिक सर्व स्वरूपात मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. याबबाबत मोदींनी केलेल्या ट्विट मध्ये "जमा झालेल्या आर्थिक ताकदीच्या बळावर देशाच्या आपत्कालिन परिस्थितीशी लढण्याच्या क्षमतेत बळ मिळणार आहे. लोकांच्या संरक्षणाबाबतच्या संशोधनासाठीही याची मोठी मदत मिळणार आहे" असे मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्येच पीएम केअर्स फँनच्या बँक अकाउंट चे सर्व डिटेल्स दिले आहेत. ज्यांना यामंडई देणगी द्यायची असेल त्यांनी याच अकाउंटवर आपले योगदान द्यावे. अकाउंट नंबर च्या बाबत कोणतीही भूल करू नये. तसेच पीएम-केअर्स फंडात छोट्यातले छोटे योगदान देखील स्वीकारण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर
नरेंद्र मोदी ट्विट
The PM-CARES Fund accepts micro-donations too. It will strengthen disaster management capacities and encourage research on protecting citizens.
Let us leave no stone unturned to make India healthier and more prosperous for our future generations. pic.twitter.com/BVm7q19R52
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
PM Cares Fund Bank Account Details
-Name of the Account : PM CARES
-Account Number : 2121PM20202
-Name of Bank & Branch : State Bank of India, New Delhi Main Branch
-UPI ID : pmcares@sbi
असेही करु शकता Payment
- Debit Cards and Credit Cards
- Internet Banking
- UPI (BHIM, PhonePe, Amazon Pay, Google Pay, PayTM, Mobikwik, etc.)
- RTGS/NEFT
सविस्तर माहितीसाठी Press Information Bureau या संकेतस्थळाला भेट द्या .
दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी मोठमोठया उद्योगपतींनी देखील कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. बॉलिवूड कलाकार, खेळाडू आणि सर्व स्तरातील नामवंतांनी कोरोनावरील उपचारांच्या कार्याला पाठिंबा म्ह्णून तसेच कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून आर्थिक पाठबळ पुरवले आहे. यामध्ये सामान्य यक्तींना सुद्धा मदत करायची झाल्यास वर दिलेल्या अकाउंटमध्ये तुम्ही आपली मदत पोहचवू शकता.