राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Elections 2023) साठी पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी 124 उमेदवारांची आहे. तसेच, या यादीत माजी मूख्यमंत्री सिद्धारमैया (Siddaramaiah) आणि कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar ) यांच्याही नावाचा समावेश आहे. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना त्यांच्या वरुणा (Varuna Assembly Constituency) मतदारसंघातून तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख डीके शिवकुमार त्यांच्या कनकापुरा (Kanakapura assembly constituency) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, या यादीनुसार.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत इतरही काही महत्त्वाच्या नेते आणि उमेदवारांचा समावेश आहे. जसे की, पक्षाने माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा यांना कोरटागेरे (SC) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री केएच मुनिअप्पा आणि प्रियांक खर्गे यांना अनुक्रमे देवनहल्ली आणि चितापूर (SC)मधून निवडणूक लढवणार आहेत. प्रियांक गी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आहे.

प्राप्त माहितीनसुार, दिल्ली येथे 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची पहिली यादी मंजूर केली. या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते.

काँग्रेस उमदेवारांची संपूर्ण यादी इथे पाहा

कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणारा काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. निवडणूक आयोगाने दक्षिणेकडील राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)