Karnataka: देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याची प्रकरणे थांबत नाही आहेत. आता कर्नाटक येथे चामराजनगर मध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 24 जणांचा बळी गेल्याच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णालयात ही घटना घडली असून काल मध्यरात्री झाली आहे. घटनेनंतर मैसूर मधील चामराजनगर येथे अडीचशे ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्यात आले आहे.खरंतर चामराजनगर रुग्णालयात बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होते. परंतु ऑक्सिजन मिळण्यास वेळ झाल्याने ऐवढी मोठी दुर्घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, मृतांमधील बहुतांशजण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यानंतर त्यांची तडफड होऊन त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक रडूनरडून बेहाल झाले आहेत.
कर्नाटकाचे आरोग्य मंत्री डॉ.के सुधाकर यांनी असे म्हटले की, चामराजनगर मधील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून मैसूर, मंड्या आणि चामराजनगर येथे जाणार आहे. तेथे झालेल्या मृत्यूसंदर्भातील आढावा घेण्यासह समस्येचे निराकरण करण्याचा ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.(India Coronavirus Update: भारतात कोरोनाच्या आणखी 3,68,147 रुग्णांची वाढ तर 3417 जणांचा बळी, आरोग्य मंत्रालयाची माहिती)
यापूर्वी कालाबुर्गी मधील केबीएन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवशी यदगिरी शासकीय रुग्णालयात लाइट गेल्याने व्हेंटिलेटरवर आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवड्यात कर्नाटक येथील काही रुग्णालयांमध्ये काही लोकांचा सुद्धा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला आहे.(दिल्लीत कोविडच्या रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक)
सध्या कर्नाटक येथे कोरोनाबाधितांचा आकडा 16 लाखांच्या पार गेला आहे. रविवारी 37 हजार कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली असून 217 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता.