Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

India Coronavirus Update:  जगभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत आहे. अशातच देशातील विविध राज्यांनी 15 दिवसांच्या कठोर लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य सेवेवर पडत असलेला ताण पाहता त्याचा फटका रुग्णांना सुद्धा पडत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता आणि औषध साठ्यात घट झाल्याने रुग्णांचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे. त्याचसोबत रुग्णांचा आकडा सुद्धा त्याच पटीने वाढत आहे. अशातच देशात कोरोनाचे आणखी 3,68,147 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 3417 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.(दिल्लीत कोविडच्या रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक)

देशात सध्या कोरोनाचे 1,99,604 रुग्ण असून एकूण 16,29,3003 जणांनी कोविडवर मात केली आहे. त्याचसोबत एकूण 2,18,959 जणांचा बळी गेला आहे. मात्र देशात आता 34,13,642 अॅक्टिव रुग्ण असून 15,71,98,207 जणांचे लसीकरण झाले आहे.(COVID-19 Spike: देशात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे 13 विरोधी पक्षांकडून केंद्राला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचे अपील)

Tweet:

दरम्यान भारतामध्ये आजपासूनच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता लसीकरण वेगवान करण्यात आले आहे. भारतामध्ये आता कोविन अ‍ॅप च्या माध्यमातून नागरिकांना रजिस्ट्रेशन करून नजिकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन कोविड 19 ची लस टोचून घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत तर रशियाची स्फुटनिक वी या लसीला देखील मान्यता देण्यात आली असून त्याचे डोसही लवकरच वितरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.