IIT Bombay मधील पदवीधर श्रवण कुमार करतोय रेल्वेत ग्रुप डी विभागात नोकरी, ट्रॅकमॅनचे मिळाले काम
Representational Image (Photo Credits: PTI)

आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून बीटेक (BTech) आणि एमटेक (MTech) चे पदवी शिक्षण घेतलेल्या श्रवण कुमार (Shravan Kumar) नावाचा तरुण रेल्वेत ग्रुप डी (Group D) विभागात नोकरीसाठी रुजू झाला आहे. तर 30 जुलै 2019 रोजी श्रवण याने रेल्वे मंडळात ग्रुप डी विभागातील कर्मचाऱ्याच्या रुपात नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र आता श्रवण याने घेतलेल्या पदवीधर शिक्षणाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. तसेच लोक त्याला भेटायला येत असून मंगळवारी डीआरएम ऑफिसमध्ये बोलावण्यात आले.

2015 मध्ये श्रवण याने आयआयटी मुंबई मधून पास झालेला श्रवण कुमार धनबाद (झारखंड) रेल्वे स्थानकात ट्रॅकमॅनचे कामकाज पाहतो. त्याचसोबत मेट्रोलॉजी अॅन्ड मटेरियल सायन्स या विषयात त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. श्रवण सध्या चंद्रपुरा मधील पब्लिक वर्क्स इंन्स्पेक्टर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. येथे श्रवण चंद्रपूर-टेलो स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकचे काम पाहतो. या नोकरीसाठी त्याची निवड आरआरबी एनटीपीसी अंतर्गत झाली होती. 2010 मध्ये आयआयटीमध्ये अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता.

मूळचा बिहार येथे राहणारा श्रवण याचे वडिल नसून तो परिवारातील पहिलाच इंजिनिअर आहे. श्रवण याने असे सांगितले की, त्याचा वडिलांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन घरातील सदस्यांचा उदर्निवाह केला आहे. मात्र आर्थिक स्थिती अधिकच खालावली जात होती. उत्तम नोकरी मिळणे सुद्धा मुश्किल झाले होता. याच परिस्थिती श्रवण याने रेल्वेत ग्रुप डी विभागात नोकरी मिळाल्याने घरातील सदस्यांनी यामध्ये आनंद व्यक्त केला.(शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसच्या तिकीट दरात 25 टक्के कपात होण्याची शक्यता)

श्रवण याच्या मते शासकीय नोकरीत जॉब सिक्युरिटी आहे. मात्र कोणतीही नोकरी लहान किंवा मोठी नाही. माझे काही मित्र प्रायव्हेट सेक्टर येथे कार्यरत आहेत. परंतु त्यांना शासकीय नोकरी करण्याची इच्छा आहे. मात्र मला आशा आहे की, मी भविष्यात एक मोठा अधिकारी नक्कीच होईन अशी भावना व्यक्त केली आहे.