शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसच्या तिकीट दरात 25 टक्के कपात होण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसच्या तिकिट दरात लवकरच 25 टक्के कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत असून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सध्या रस्ते वाहतूक आणि विमान प्रवासामुळे प्रवाशांचा कल या दोन माध्यमांना जास्त दिसून येत आहे. तसेच शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसच्या तिकिट दर सर्वाधिक असल्याने प्रवासी याच्या माध्यमातून प्रवास करणे टाळत असल्याचे दिसून आले आहे. परंतु तिकिट दर कपात कोणत्या मार्गांसाठी असणार याबद्दल ही निर्णय घेण्यात येणार आहे.(IRCTC ची नवी सुविधा, पैसे न भरता प्रवाशांना काढता येणार रेल्वे तिकिट)

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, ज्या एक्सप्रेसमधील अर्ध्यापेक्षा अधिक सीट रिक्त राहतील त्यांच्यासाठी ही सवलत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच वातानुकूलित खुर्ची यानस एक्झीक्युटीव्ह खुर्ची यान यांच्यावर सवलत देण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षात रेल्वे तिकिट दर वाढवले गेले आहेत. खासकरुन प्रिमियम ट्रेन आणि एसी ट्रेनच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे.