IRCTC ने प्रवाशांना तिकिट न काढता रेल्वेने प्रवास करता येईल अशी नवी सुविधा सुरु केली आहे. ePayLater असे या सुविधेचे नाव आहे. यामध्ये प्रवाशांनी तिकिट काढल्यानंतर 14 दिवसांनी तिकिटाचे पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीने ई पे लेटरच्या सहाय्याने प्रवाशांना आयआरसीटीच्या संकेतस्थळावरुन तिकिट काढता येणार आहे. तसेच तिकिटाचे पैसे 14 दिवसानंतर भरावे लागणार आहे. मात्र तिकिटाचे पैसे नंतर भरताना प्रवाशांना त्यावर 3.5 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागणार असल्याची अट आहे. त्यामुळे 14 दिवसांच्या आतमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त व्याज द्यावे लागणार नाही. तसेच वेळेवर पैसे भरल्यास क्रेडिट लिमिटसुद्धा वाढवण्यात येणार आहे.(हेही वाचा-प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC ने सुरु केली नवी 'iPay' पेमेंट सुविधा; ही आहे खासियत)
परंतु तिकिट खरेदी करताना आयआरसीटीसीच्या अकाऊंटवर तुमच्याकडे तिकिटाची किंमत क्रेडिटेड असणे गरजेचे आहे. मात्र तिकिटाचे पैसे 14 दिवस उलटून गेल्यावर सुद्धा भरले नसल्यास तिकिटावरील व्याज वसूल केला जाईल. त्याचसोबत अधिक वेळ पैसे भरण्यास घावल्यास तुमचे अकाऊंट रद्द होणार आहे.