Champai Soren (PC - Facebook)

झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून लवकरच या राज्यामध्ये सत्ताबदल पाहता येऊ शकतात. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चंपई सोरेन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 3 जुलै रोजी चंपई सोरेन यांचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आपल्या मनाविरुद्ध राजीनामा घेतल्यामुळे चंपई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. (हेही वाचा - Jharkhand BJP MLAs Suspended from Assembly: झारखंड विधानसभेतून भाजपचे 18 आमदार निलंबित; मार्शलच्या मदतीने करण्यात आली उचलबांगडी)

पाहा पोस्ट -

“मी नाराज असल्याची अफवा कशी पसरली, याची मलाच कल्पना नाही. माध्यमे कोणत्या बातम्या चालवत आहेत, याबाबत मला निश्चित कल्पना नाही. मी जिथे होतो, तिथेच आहे.” यावेळी पत्रकारांनी तुम्ही दिल्लीला कधी निघणार आहात? असाही प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “आता तरी मी घरी चाललोय, पुढचे काही सांगू शकत नाही.” असे चंपई सोरेन  यांनी सांगितले.

आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बाहेर न पडलेले चंपई सोरेन आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत भाष्य केले.