झारखंड येथे झालेल्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

झारखंड (Jharkhand) मधील डुमका (Dumaka) येथील सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (2 जून) सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून 1 जवान जखमी झाले आहेत. तसेच चार जवान जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर गंभीर जखमी झालेल्या जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर अन्य तीन जणांवर डुमका येथील नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सूत्रांकडून रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत 15-2 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती.(BSF Recruitment 2019: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सीमा सुरक्षा दल करतंय नोकर भरती, जागा, पात्रता, इतर माहिती घ्या जाणून)

त्यानुसार सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले असून अद्याप परिसरात शोधमोहिम सुरु आहे.