Jashpur Snakebite Incident: छत्तीसगढ मध्ये  8 वर्षीय मुलाने सर्पदंशाच्या रागात विषारी सापालाच उलटं चावून केलं ठार; मुलाची प्रकृती स्थिर
Sneak | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits-Twitter)

छत्तीसगढ (Chhattisgarh) मधील जशपूर (Jashpur) ची ओळख ही नागलोक अशी देखील आहे. या भागात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर येत असतात. नुकताच या भागात सर्पदंशाची (Snakebite) अजून एक विचित्र घटना समोर आली आहे. बगिचा ब्लॉक मधील पंडरापाठ भागात एका लहान मुलाल विषारी सापाने दंश केला. त्यानंतर रागाच्या भरात त्या मुलानेही सापाचा चावा घेतला. त्या मुलाचा चावा इतका भयंकर होता की तो साप चक्क जागीच मेला. या घटनेची खबरबात जेव्हा मुलाच्या घरी पोहचली तेव्हा त्यांनी धावाधाव करत मुलाला हॉस्पिटलमध्ये हलवले. या मुलाची प्रकृती स्थिर आहे.

पंडरापाठ येथे राहणार्‍या 8 वर्षीय दीपक राम त्याच्या घराजवळच बहिणीकडे गेला होता. तेथे खेळता खेळता त्याला हाताजवळ सर्पदंश झाला. साप चावल्यानंतर निडर दीपक भडकला आणि त्याने साप निघून जाण्याच्या आधीच त्याला पकडलं आणि दाताने त्याचा चावा घेतला. यामध्ये सापाला गंभीररित्या जखमी केले आणि तो साप जागीच ठार झाला.

एबीपी लाईव्ह च्या माहितीनुसार, साप चावल्याचं जेव्हा दीपकच्या बहिणीला सामजलं तेव्हा तिने तातडीने प्रथमोपचार केले. दीपक राम ने दिलेल्या माहितीत तो खेळत असताना मागून साप आला आणि चावला. नक्की वाचा: अविश्वसनीय! Burmese Python ने अवघ्या काही सेकंदात गिळलं अख्ख हरीण! Viral Video करेल थक्क .

जशपूर जिल्ह्यामध्ये हा अंधविश्वास आहे की साप चावला तर त्याला आपणही चावावं. यामुळे विषाचा प्रभाव होत नाही. दीपल सोबत घडलेली घटना ही त्याने रागाच्या भरात केलेली कृती होती. आता हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.