Pramod Sawant (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लोण भारतात झपाट्याने पसरत चालले असून याची झळ महाराष्ट्रासह गोवा (Goa) राज्याला देखील सोसावी लागत आहे. या कोविड-19 (COVID-19) चा वाढता फैलाव लक्षात घेता गोवा जिल्ह्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ठेवलेला कर्फ्यू हा गोव्यात पुढील 3 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. गोवा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुन हा कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या संपूर्ण देशावर कोरोना व्हायरस महाभयानक विषाणू घोंगावत आहे. यातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी देशातील सर्व राज्यातील शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या फैलाव होऊ नये यासाठी घराबाहेर न पडणे, गर्दी टाळणे यासाठी आज 'जनता कर्फ्यू' लावण्यात आला होता. या कर्फ्यू आणखी 3 दिवस सुरु ठेवण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन, कलम 144 लागू : उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

केवळ एका दिवसापुरतं जनता कर्फ्यू न ठेवता याचा कोरोना च्या लढाई विरोधात अधिक चांगला परिणाम व्हावा यासाठी गोवा सरकारने या कर्फ्यू आणखी तीन दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर देशात आज ठेवण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ची वेळ ही सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र ही वेळ आता वाढवून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात ही वेळ उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी संपूर्ण देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'जनता कर्फ्यू' ठेवला होता.