जम्मू-काश्मिर येथे 40 वर्षीय नागरिकाचे अपहरण करुन दहशतवाद्यांकडून हत्या
Terrorists | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मिर येथे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नावच घेत नाही आहे. तर गुलजारपोरा येथे दहशतवाद्यांकडून गुरुवारी रात्रीच्या वेळेस एका 40 वर्षीय नागरिकाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या नागरिकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंजूर अहमद लोन असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो डोगरीपोरा येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस तपासात असे समोर आले आहे की, दहशतवाद्यांनी या मंजूर अहमदवर जबरदस्ती करत त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याचावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत मंजूर याचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(हेही वाचा-जम्मू-काश्मिर: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुद्दसिर ह्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश)

यापूर्वी गुरुनापी जम्मू-काश्मिर येथील नॅशनल कॉन्फरन्समधील एका नेत्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे बिजबेहरा ब्लॉक अध्यक्ष मोहम्मद इस्माइल वानी असे या नेत्याचे नाव असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.