
जम्मू- काश्मीर (Jammu-Kashmir) मधील कठुआ (Kathua) येथे गेल्या वर्षी 2018 मध्ये एक आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच या अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आला होता. या प्रकरणी आज (10 जून) विशेष न्यायालयात याबात निकाल लागणार आहे.
यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी 10 जून रोजी कठुआ बलात्कार प्रकारणाचा निकाल जाहीर करु असे म्हटले होते. त्यामुळे निकाल जाहीर होण्यापूर्वी न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच पंधरा पानांचे आरोपपत्र सत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.(#GoodBy2018: सन 2018 मध्ये सोशल मीडियावर टॉप ट्रेंड ठरलेले हॅशटॅग)
तर 10 जानेवारी 2018 रोजी या अल्पवयीन मुलीची बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तर आरोपींवर लावण्यात आलेल्या चार्जशीट नुसार, बलात्कार आणि हत्या करण्यामागे सांजी राम याचा हात होता. त्यानेच या अल्पवयीन मुलीचे अपहरण, हत्या आणि दुष्कर्म करण्याचा विचार केला होता. त्याचसोबत सांजी राम यांचा अल्पवयीन भाचा, मुलगा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात आली.